डोबिवली: मेट्रोचे काम कल्याण शीळ।रस्त्यावर डोंबिवली हद्दीत सुरू झाले असून त्यामुळे त्या रस्त्या लगतच्या दुतर्फा दिशेकडील रहिवाशांना त्या कामाचा त्रास होत असून त्यांच्या झोपेचे खोबरे झाले आहे, ही वस्तुस्थिती असून शेकडो नागरीकांनी मला तक्रारी।केल्या आहेत, ते काम त्या पट्ट्यात तात्काळ बंद करा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी भूमिका मनसेचेआमदार राजू पाटील यांनी गुरुवारी घेतली.
लोकमत मधील वृत्ताचा आधार घेत पाटील यांनी तेथील रहिवासी राजू नलावडे यांच्यासह नागरिकांशी चर्चा।केली, त्यांची व्यथा जाणून घेतली. त्या समस्येवर उपाय म्हणजे लोढा प्रिमियर पासून तळोजा टप्पा प्रथम चालू करावा. तोपर्यंत पलावा पूल व इतर पर्यायी रस्ते कसे तयार करता येतील यावर एक बैठक एमएमआरडीएमध्ये ठेवली असून ती पुढील आठवड्यात अपेक्षीत असल्याचे पाटील।म्हणाले.
जिथे फारसे नागरीकरणं नाही त्या भागात आधी काम करावे, जेणेकरून दाट वस्तीच्या नागरिकांना तूर्तास दिलासा।मिळेल यावर संबधीत यंत्रणांनी भर द्यावा. मेट्रोचे काम व्हाययलाच हवे ही माझीही भूमिका आहे परंतु त्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका, ते चालणार नाही अशी स्पष्ट भुमीका पाटील यांनी घेतली. त्यासंदर्भात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असून पलावाचा उड्डाणपूल कामाला गती देण्यासाठीही पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले.
सध्या त्या ठिकाणी अहोरात्र काम सुरू असून त्या अवाढव्य यंत्र सामग्रीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कर्णकर्कश आवाज, धूळ यामुळे एक झाले की एक समस्या सुरूच असुन त्यातून सुटका कधी होणार असा सवाल नागरिकांनी केला असून नागरिकांची व्यथा योग्य आहे. सध्या।उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, लहान मुले घरात असतात, पाहुणे मंडळी येत असतात त्यामुळे आवाजाचा त्रास नागरिकांना नको असेही पाटील म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त।केल्याचे नलावडे म्हणाले.