डोंबिवली: वातानुकूलित लोकलमध्ये एसीची हवा लागत नसल्याने लोकल प्रवाशांनी कल्याणरेल्वे स्थानकात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी सकाळी ८:४६ वाजेदरम्यान घडली. मात्र लोकलचे सर्व दरवाजे स्थानकात उघडे असल्याचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने त्यातील तथ्यता तपासणी बाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितल्यावर लोकल मुंबईकडे धावली. या गोंधळात रेल्वेचा दरवाजा अडवून धरणार्या दोन प्रवाशांना नोटीस देऊन त्यांना तसे न करण्याबाबत सांगण्यात आले.
तसेच एसी प्रमाणात कार्यान्वित होता की नाही याचीही माहिती घेऊन त्याचा तपशिल देण्याची मागणी रेल्वे पोलिस दलाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. जर वातानुकूलित यंत्रणेत समस्या असेल तर संबंधित दोन प्रवाशांवर कोणतीही कारवाई करणार नाही, पण जर यंत्रणा योग्य असेल तर मात्र दरवाजा अडवणूक करणाऱ्या त्या दोघांवर रेल्वे नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.