कल्याण- कल्याण ते सीएसटी दरम्यान रेल्वे लोकल गाड्यांच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढावा. प्रवाशाना या त्रासातून दिलासा द्यावा अशी मागणी शिंदेसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातून मोठ्या संख्येने नागरिक ठाणे, दादर मुंबईच्या दिशेने कामानिमित्त रोज रेल्वे प्रवास करतात, या प्रवासादरम्यान सरकारी सुट्टी आणि बँक हॉलिडे या दिवशी खाजगी तसेच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना रेल्वे लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.. सरकारी सुट्टीच्या आणि बँक हॉलिडे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सीएसएमटी ते कल्याण स्टेशन डाऊन मार्ग तसेच कल्याण डोंबिवली स्टेशन ते सीएसएमट.स्टेशन अप मार्ग आहे. एसी लोकल ,१५ डब्ब्याच्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येतात.त्याचाअतिरिक्त बोजा हा आसनगाव, टिटवाळा, कर्जत , कसारा अंबरनाथ आणि बदलापूर या दिशेने जाणाऱ्या लोकलवर पडतो. प्रवाशांना लोकलमध्ये चढण्या उतरण्यास त्रास होत आहे. गर्दीच्या वेळी गाडी पकडताना गाडीतून प्रवासी पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. या समस्येकडे खासदार शिंदे यांनी लक्ष घालून रेल्वेची चर्चा करावी. यावर तोडगा काढावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.