कल्याण-कल्याणच्या वालधूनी नदी पात्रात केमिकल सोडणा:या टँकरला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टँकर चालकाचे नाव नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरचा रहिवासी आहे. केमिकलचा टँकर ही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
मलंग गडाच्या डोंगर रांगातून उगम पावणारी वालधूनी नदी अंबरनाथ, उ्ल्हासनगर ते कल्याण खाडीपर्यंत वाहते. ही नदी सगळ्य़ात जास्त प्रदूषित नदी आहे. हीचे पाणी पिण्या योग्य नाही. या नदी पात्रत कचरा, घनकचरा टाकला जातो. तसेच घरगूती सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. त्याचबरोबर रासायनिक सांडपाणी सोडले जाते. नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध पर्यावरण प्रेमी सामाजिक संघटना प्रयत्नशील आहे. पाहाटे दोन वाजताच्या सुमारास प्रेम ऑटोजवळ एक केमिकल्सचा टँकर नदी पात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरण प्रेमींना मिळाली. त्यांनी त्याठिकाणी पहाटेच धाव घेतली. टँकर चालकास मज्जाव केला.
तसेच महात्मा फुले पोलिसांना पाचारण केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गासही बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी टँकर चालकास ताब्यात घेतले. त्यांचा केमिकलचा टँकरची जप्त केला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक दीपक सरोदे यांनी दिली आहे. हा केमिकलचा टँकर झोडियाक कंपनीचा असून तो वाडा येथून कल्याणमध्ये वालधूनी नदी पात्रात रिता करण्यासाठी आणला गेला होता. या घटनेवरून आजही रासायनिक प्रक्रिया करणा:या अनेक रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी आसपासच्या नदी पात्रात सोडून नदी प्रदूषित करीत आहे.
एक प्रकारे नागरीकांच्या जिविताशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. वालधूनी नदी प्रदूषित असली तरी तिचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळते. त्यामुळे कल्याणची खाडी प्रदूषित होत आहे. यापूर्वी अशा प्रकारे नदी नाल्यात सोडले जाणारे केमिकल्स टँकर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गेलेले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयाने एमआयडीसी परिसरात केमिकल्स टँकरच्या वाहतूकीला सायंकाळी सहा ते पहाटे सहा वाजताच्या दरम्यान मज्जाव केला होता. तसेच वॉच ठेवण्यासाठी केबिन्स तयार केल्या होत्या. तरी देखील अशा प्रकारच्या घटना घडत असून त्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"