शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कल्याण डोंबिवलीतून मुंब्रा येथे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीसा

By मुरलीधर भवार | Published: November 11, 2023 4:40 PM

कल्याण डोंबिवलीमधून देखील शेकडो शिवसैनिक मुंब्रा येथे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दाखल होणार आहेत.

कल्याण-मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट दोन्ही आमने सामने उभे ठाकलेत . ठाकरे गटाने शाखे प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मुंब्रा येथे उद्धव ठाकरे येणार असून या शाखेला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकाकडून मुंब्रा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. कल्याणडोंबिवलीमधून देखील शेकडो शिवसैनिक मुंब्रा येथे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवली मधील शहर प्रमुख उपजिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर ,कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील , यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या कारवाई विरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली .सरकारकडून सत्तेचा गैरफायदा घेत कायमच दबावाचे राजकारण केले जाते, पोलिसांकडून दबाव टाकत अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी नोटीसा बजावल्या तरी आम्ही मुंब्रा येथे जाणार अशी ठाम भूमिका ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख पालांडे यांनी मांडली आहे.

टॅग्स :mumbraमुंब्राUddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली