सदर चिमुकल्याला पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं ना! पण आता या गोंडस बाळाला गरज आहे ती आपल्या सर्वांची .. होय खरं ऐकलं तुम्ही.. या निरागस बाळाच नाव आहे प्रियांश.. प्रियांश ला सुद्धा इतर मुलांप्रमाणे बालपणाचा आनंद घ्यायचाय, उड्या मारायाच्यात.. हातात वस्तू घेऊन दूरवर फेकायच्यात, आई वडिलांसोबत खूप खूप मस्ती करायची आहे. पण, सध्या तो हे काहीच करू शकत नाही. कारण त्याला अलन हार्डनून ड्युडली सिंड्रोम हा दुर्मिळ आजार झालाय. या आजारात स्वतःच्या शरीरावर ताबा राहत नाही.. हातात कुठली वस्तू दिली तर ती मुलाला पकडता देखील येत नाही. ठाण्यात वर्तकनगर परीसरात राहणारे विरकर कुटुंब जवळपास गेली वर्षभर प्रियांशवर विविध ठिकाणी उपचार करत आहेत.
प्रियांशचे वडील अतुल विरकर हे एक कलाकार असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या देखील हाताला काम नाही. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे प्रियांशचे उपचार सुरू असल्याने त्यांना कोरोना काळात अधिक काळजी घ्यावी लागतेय.नेदरलँडवरून प्रियांशची औषध मागवली जातायेत. हाजीआली येथील लहान मुलांच्या दवाखान्यात प्रियांशवर उपचार सुरू असून अन्य रुग्णालयांमध्ये त्याची ओक्युपेशनल थेरपी सुद्धा सुरुये. वेळोवेळी प्रियांशच्या तपासण्या सुद्धा कराव्या लागत आहेत.
अवघ्या 20 महिन्याच्या प्रियांश सुद्धा हळूहळू हातात दिलेली वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतोय.त्याच्या जिद्दीचे कौतुक करावं तितकं कमीच. त्याच्या या जिद्दीला तुमची शक्य होईल तितकी साथ मिळाली तर एक दिवशी प्रियांश देखील इतर मुलांप्रमाणे खेळेल. त्यामुळे प्रियांश ला नक्की मदतीचा हात तुम्ही पुढे द्या.
Account Details
State bank of indiaAtul ashok virkarA/c No - 11252479538Ifccode - SBIN0013035Branch samtanagar thane westGoglepay no...9967380241