शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

स्टेरॉइड, सीटी स्कॅनची योग्य मात्रा रुग्णांसाठी घातक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:23 PM

अतिवापर झाल्यास धोका : स्टेरॉइडमुळे बुरशीजन्य आजाराची शक्यता

मुरलीधर भवार

कल्याण : कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो व त्यामुळे अनेक रुग्ण वारंवार सीटी स्कॅन करतात. स्टेरॉइड आणि सीटी स्कॅनच्या अतिवापरामुळे रुग्णाला कॅन्सर होऊ शकतो, असा दावा एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, आतापर्यंत भारतात सीटी स्कॅनच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचे एकही उदाहरण डोळ्य़ांसमोर नाही, असे कल्याणच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सीटी स्कॅन आणि स्टेरॉइडच्या वापरामुळे कॅन्सर होतो याबाबत वैद्यकीय क्षेत्रात दुमत आहे. पूर्वी सीटी स्कॅनच्या जुन्या प्रकारच्या मशीन होत्या. गेल्या पाच वर्षांत अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध आहेत. एफडीने ठरवून दिलेल्या मात्रेनुसार रेडिएशनचा डोस मशीनद्वारे दिला जातो. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. स्टेरॉईडचा अतिवापर केल्यावर बुरशीजन्य आजार होऊ शकतात. अर्थात सीटी स्कॅन व स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे हे होऊ शकते. एकदा सीटी स्कॅन केल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्पकाळ स्टेरॉइडचे सेवन केल्याने धोका संभवत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे.

बुरशीजन्य आजाराचा धोकास्टेरॉईडचा योग्य वापर केल्यास बुरशीजन्य आजाराचा धोका नाही. मात्र, त्याचा अतिवापर केल्यास बुरशीजन्य आजार रुग्णाला उद्भवू शकतात. ओव्हर डोस झाल्यावर बुरशीजन्य आजाराची शक्यता असते. अनेक डॉक्टर रुग्णाला जास्तीचा डोस देत नाहीत. त्याचा अतिवापर करीत नाहीत. त्यामुळे बुरशीजन्य आजाराचा धोका कमी असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

nकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज १२०० जणांचे सीटी स्कॅन केले जातात. त्यात सर्वच रुग्ण हे कोविड संशयित नसतात. nत्यामध्ये अन्य आजारांच्या रुग्णांचेही प्रमाण आहे. कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सीटी स्कॅनचे प्रमाण वाढले होते. nमात्र, रुग्णसंख्या गेल्या पाच दिवसांपासून कमी होत असल्याने सीटी स्कॅनचे प्रमाण या पाच दिवसांत ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.

एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रेजुन्या प्रकारच्या सीटी स्कॅन मशीन्समध्ये तशा प्रकारचे एक्स-रे होते. आता नव्या प्रकारच्या मशीन्समध्ये एफडीने दिलेल्या डोसनुसार मशीन रन केली जाते. त्या ठिकाणी डोसचे प्रमाण कमी असते. डोसचे प्रमाण कमी असल्याने त्यातून रुग्णाला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही.

कोविड रुग्णाला लक्षणे आढळल्यास त्याला लगेच सीटीस्कॅन करण्यास सांगितले जात नाही, तर सहा दिवसांनंतरही त्याच्या अंगातील ताप जात नसेल. त्याच्या छातीत कफ साचला असेल तरच त्याला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. सीटी स्कॅनमध्ये एफडीच्या निकषानुसार  रेडिएशनचा डोस दिला जातो. त्यामुळे रुग्णाला कॅन्सरचा धोका उद्भवत नाही.-डॉ. प्रशांत पाटील, रेडिओलॉजिस्ट, कल्याण.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याण