शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

आंदोलकांची भेट न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:19 PM

उल्हास नदीचे प्रदूषण : जगन्नाथ शिंदे यांनी केली चर्चा

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या वतीने नदीपात्रात सुरु असलेल्या आंदोलनास भेट न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी निषेध केला आहे.

संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्या पुढाकाराने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर आणि कैलास शिंदे हे आंदोलन करीत आहे. हे आंदोलन दिवसरात्र नदीपात्रात सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकरणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या प्रकरणी काय तोडगा काढता येईल याविषयी विचारणा केली. त्यावर अधिकारी त्याठिकाणी येणार नाही. चर्चेकरिता आंदोलन करणाऱ्यांनी महापालिकेत यावे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.

या उत्तराने शिंदे संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला न येणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त केला. महापालिकेस शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आता १५ फेब्रुवारी रोजी शिंदे शहर अभियंत्याना भेटून या संदर्भात चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आयुक्तांचीही भेट मंगळवारी घेणार आहेत. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन तूर्तास तरी सुटण्याचा काही एक मार्ग नाही. आंदोलन करणाऱ्यांनीही ठोस उपाययोजना केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.