मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण वाहतूक विभागाच्यावतीने रस्ते सुरक्षितता आणि वाहतूक नियमांबाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती सुरू आहे .कल्याणमधील दुर्गाडी चौकात आज वाहतूक पोलीसांकडून जनजागृती अभियान राबवण्यात आले .यावेळी प्रतीकात्मक यमराजाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देत वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
हातात प्रतीकात्मक शस्त्र घेत रस्त्यावर फिरणारा यमराज पाहून काही जण थबकले. तर काही जणांनी गाडीला ब्रेकच लावला . त्रिपल सीट, विना हेल्मेट , विना सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना यमराजने पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी , पोलिस निरीक्षक गिरीश बने यांच्यासह वाहतूक पोलिस अमलदार आणि ट्राफिक वार्डन सहभागी झाले होते.