राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

By मुरलीधर भवार | Published: April 3, 2023 08:34 PM2023-04-03T20:34:57+5:302023-04-03T20:35:06+5:30

'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.'

Rahul Gandhi should run the Ghana one day, I will leave ShivSena, MLA Vishwanath Bheir's challenge to Congress | राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

googlenewsNext

कल्याणस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भाेगली. त्यांनी त्याठिकाणी घाणा चालविला. राहूल गांधीनी एक दिवस ताेच घाणा चालवून दाखविल्यास शिवसेना पक्ष साेडून देईन असे आव्हान शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी काॅंग्रेस पक्षाला दिले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर गाैरव यात्रा ६ एप्रिल राेजी कल्याणमध्ये काढण्यात येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी हाेण्याची शक्यता आहे.

ही यात्रा खडकपाडा येतून सांयकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. यात्रेचा समाराेप गाैरीपाडा येथे हाेणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयाेजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार भाेईर यांनी राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला. याप्रसंगी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, पदाधिकारी प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जून भाेईर, माजी नगरसेविका वैशाली पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक माेहन उगले आदी मान्यवर उपस्थित हाेते.

यावेळी आमदार भाेईर यांनी राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले. राहूल गांधीने सावरकरांचा वारंवार जाे अपमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आत्ता पेटून उठला आहे. सावरकरांचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सारे सावरकर हे दाखविण्यासाठी ही गाैरव यात्रा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

प्रखर देशभक्त सावरकर यांच्या विराेधात बाेलण्याचा अधिकार राहूल गांधीला काेणी दिला असा सवाल भाेईर  यांनी उपस्थित केला आहे. काॅंग्रेसवालेही त्याला कंटाळले आहेत. राहूल गांधी काॅंग्रेससह त्यांच्या मिक्ष पक्षांकरीता  अवघड जागेचे दुखणे हाेऊन बसले आहेत. युवराज असेल तर ताे त्याच्या घरी अशा शब्दात भाेईर यांनी टिका केली.

Web Title: Rahul Gandhi should run the Ghana one day, I will leave ShivSena, MLA Vishwanath Bheir's challenge to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.