उल्हासनगर : शहरातील महादेव कंपाऊंड येथील एस. के. प्लास्टिक कारखाण्यावर महापालिका पथकाने गुरवारी रात्री ९ वाजता धाड टाकून कारवाई केली. धाडीत ९ मॅट्रिक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरात सर्वाधिक प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने असून रात्रीच्या वेळी लपून छपून प्लास्टिक पिशव्या शहरासह दुसऱ्या शहरात पाठविल्या जातात. तसेच पॅकिंगच्या नावाखाली काही कारखान्याना महापालिकेने परवानगी दिली आहे. महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशाने सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केणे व प्लास्टिक निर्मूलन पथकाचे प्रमुख जितेंद्र राठी यांच्यासह प्रदूषण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी राजेश नांदगावकर, क्षेत्र अधिकारी अनिरुद्ध वराळे आदींनी संयुक्तरित्या गुरवारी रात्री एस के प्लास्टिक कारखान्यावर कारवाई केली आहे.
महापालिका धाडीच्या चौकशीत इपीआर नंबरशिवाय पॅकेजींग पिशव्याचे उत्पादन व विक्री करीत असल्याचे कारवाई वेळी उघड झाले. मोठे उत्पादन करून प्लास्टिक पिशव्या शहरात तसेच शहराबाहेर विक्री करीत असल्याचे चौकाशीत उघड झाले. महापालिकेने संयुक्त कारवाईत ९ मेट्रिक टन प्लास्टिक पिशव्या जप्त्त करून कारखान्याला १० हजाराचा दंड ठोठावला आहे. याशिवाय भावजीनगर येथील गोल्डन बेकरी येथून बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्याचा वापर व विक्री करीत असल्याचा प्रकार उघड झाला. बेकरीतून दीड किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ५ हजाराचा दंड ठोठावला आहे. प्रदूषण मंडळाकडून इपीआर नंम्बर न घेतलेल्या अशा सर्व कारखानदारावर यापुढे सतत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याने सूचित केले. प्रदूषण मंडळ व महापालिकेच्या परवान्यानंतरच फूड पॅकेजिंग प्लास्टिक पिशव्याचे उत्पादन, व विक्री करता येईल. असे अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर म्हणाले. कारखानदारास रिसायकल करणे आता शासनाने सक्तीचे व बंधनकारक केले. नियमांचे पालन न करणाऱ्या अशा सर्व उत्पादकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी दिले.
प्लास्टिक पिशव्याचा वापर महापालिकेने प्लास्टिक पिशव्यावर बंदी असल्याचे फर्मान काढूनही शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा देवाणघेवाण केली जाते. एक व्यापारी नेता यामध्ये दलालीची भूमिका वठवित असल्याची बोलले जाते.