डोंबिवली: दिवा स्थनाकातील विविध समस्या, प्रस्तावित व सुरू असलेल्या कामांची पाहणी प्रवासी सुविधा समिती, रेल भवन, नवी दिल्लीचे सदस्य आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी केली. त्यावेळी प्रवाशांनी त्यांच्याकडे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा अशी मागणी करत, दिवा मुंबई लोकल सोडण्यासह अन्य मागण्या केल्या. त्यानिमित्ताने त्या समितीने दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पाहणी दौऱ्यात दिवा-सीएसटी लोकल, कोकणात जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा, दिवा पूर्वेला मुंबई दिशेकडील मंजूर इलेव्हटेड तिकीट घर, स्वयंचलित सरकते जिने, दिवा पश्चिमेला तिकीट घराजवळ नवीन सरकता जिना, महिलांसाठी शौचालय, मुबलक पिण्याचं पाणी अशा इतर सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्या दौऱ्या समितीचे अध्यक्ष पी. के. कृष्णदास, सदस्य कैलास वर्मा, विभाषवानी अवस्थी, दिलीप कुमार मलिक, के. रवीचंद्रन, अभिजित दास, छोटुभाई पाटील, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे संदेश भगत, सुनील शिंदे, नितीन ओतूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या समितीने रविवारी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी।केली होती,त्या पाहणीत त्यांनी अवश्यकत तिथे तात्काळ पंखे लावणे, पाण्याचे कुलर असलेल्या टाक्या वेळीच स्वच्छ करणे, त्यावर स्वच्छतेच्या तारखेची पाटी लावणे, तसेच बांधकाम।विभागाच्या अधिकार्यांना प्रवासी सुरक्षा दृष्टीने काही तांत्रिक दुरुस्ती तातडीने करण्याबाबत सांगितले.
ठाणे स्थानकातही त्यांनी सोमवारी पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकार्यांना प्रवाशांच्या दृष्टीने सुधारणा, बदल तातडीने करण्यासाठी तिकीट घरात पंखे, स्वच्छता बाकडी तसेच स्थानक स्वच्छता, लांबपल्याच्या गाड्या जिथे थांबतात त्या आणि अन्य फलाटात पाणपोई, पादचारी पुलावरील गर्दी यांसह अन्य विषयांवर चर्चा केली.