कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका मुख्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावडय़ानिमित्त सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. १४ ते २८ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरावडा पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने ही रांगोळी करण्यात आली आहे.
सर्व कामकाज मराठी भाषेतून केले जावे. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळालेला नाही. केंद्राकडे त्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मराठी भाषेतून महापालिकेचे कामकाज होत असले तरी आजही निविदा प्रक्रिया आणि निवेदेसाठी कंत्रटदारासोबत केले जाणारे करार हे इंग्रजी भाषेत असतात. त्यामुळे सामान्य मराठी कंत्रटदाराला त्याचे अर्थ बोध होत नाही. त्याचबरोबर नगररचना विभागात लिहिल्या जाणा:या नस्तीवरील टिपण्या या मराठी भाषेतील असल्या तरी इमारत बांधकामाचे बहुतांश प्रस्ताव व त्यासाठीचे कागदपत्रे ही इंग्रजी भाषेत असतात. त्याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे.
मराठी भाषेचा पूर्णपणो कार्यालयीन कामकाजासाठी वापर झाला पाहिजे असा आग्रह धरला जात आहे. किमान भाषा पंधरावडय़ात त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी मराठी भाषा प्रेमींकडून केली जात आहे. मराठी ही कामकाजाची भाषा झाली पाहिजे. तरच ती रोजगारी भाषा होऊ शकते. त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. आजही जिल्हा सत्र न्यायालयाच्या पातळीवर मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजासाठी केला जात असला तरी न्याय व्यवस्थेपूढे सादर केले जाणार अपिल, अर्ज हे मराठी ऐवजी इंग्रजीत असतात. न्यायालयीन कामकाजातही मराठी पूर्णपणो वापर केला जात नाही.