कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरातील फूल मार्केटमधील ९३० ओटेधारकांचे ओटे आणि शेडवर बाजार समिती प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले होते. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात असलेले ५६४ ओटेधारकांची पुनर्तपासणी कालपासून महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.
या पुनर्तपासणीचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिले आहे. त्यानुसार कल्याण पश्चिमेतील नारायणवाडीतील सोमन हाईट्स या ठिकाणी ही पुनर्तपासणी सुरु करण्यात आली आहे. ही तपासणी 13 जानेवारीर्पयत चालणार आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत महापालिकेचे भाडेकरु आहेत. महापालिकेने फूल आणि भाजी मार्केटमधील काही शेड आणि ओटे भाडेकरु व्यापा:यांना विकसीत करुन दिले होते. मात्र फूल मार्केट विकसीत करण्याकरीता महापालिकेकडे बाजार समितीने बांधकाम परवानगी मागितली होती.
दरम्यान या प्रकरणी विकास कामाला आक्षेप घेणारी याचिका न्यायप्रविष्ट होती. न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीने या भाडेकरुंच्या शेड तोडण्याची कारवाई केली. त्याला बाजार समितीतील भाडेकरु विक्रेत्यानी तीव्र विरोध केला. बाजार समितीला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे आणि व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी बजरंग हुलावणो यांनी आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात न्यायालयीन लढा लढण्याचे आश्वासन आयुक्तानी दिले होते. महापालिकेने बाजार समितीला केवळ बांधकाम परवानगी दिली होती. महापालिकेचे भाडेकरु यांच्यासोबत भाडेकरा, हस्तांतरण आणि सुनावणीचे अधिकार हे महापालिकेचे आहेत. त्यासाठी महापालिकेने भाडेकरुंच्या पुनर्तपासणीचे शिबीर आयोजित करुन त्यांच्याकडून अनामत रक्कम भरल्याची पावती, मूळ ताबा पावती, कार्यकारी अभियंत्याकडून ओटा हस्तांतरीत झाल्याची पावती, सप्टेंबर 2 पर्यंत भाडे भरल्याची पावती, आधारकार्ड तपासणी कामी देणो आवश्यक आहे. भाडेकरुनी महापालिकेच्या मालमत्ता विभागाव्यतिरिक्त अन्य कोणत्या संस्थेशी केलेल्या आर्थिक व्यवहाराला महापालिका जबाबदार नाही. त्यामुळे असा व्यवहार करु नये असे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने स्पष्ट केले आहे. भाडेकरुंना गाळा देतो असे सांगून भाडेकरुंकडून अनेकांनी लाखो रुपयांच्या रक्कमा मागितल्या आहेत. तसेच काहींनी ही रक्कम उकळून फसवणूकही केल्याच्या तक्रारी आहेत.