कल्याण: कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. दावडी येथे सिमेंटचा रस्ता तयार केल्यावर तो पुन्हा जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आहे. रस्ता तयार करण्या आधीच जलवाहिनी का टाकली नाही असा संतप्त सवाल करीत मनसेचे कार्यकर्ते अरुण जांभळे यांनी महापालिकेच्या सुपरवायझरला गुलाब पुष्प आणि श्रीफळ देत त्याचा सत्कार केला. नागरीकांच्या पैशाची बदबादी थांबवा अशी कळकळीची विनंती केली. तूर्तास महापालिकेन हे काम थांबविले आहे.
कल्याण शीळ हा नेहमची चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. या रस्ते कामाच्या गुणवत्तेविषयी मनसे आमदार राजू पाटील यांनी अनेकवेळा प्रश्न चिन्ह उपस्थीत केले आहे. दावडी येथे तयार केलेला रस्ता पुन्हा खोदला. त्याठिकाणी मनसे कार्यकर्ते अरुण जांभळे कार्यकत्र्यासह पोहचले. त्यांनी सुपरवायझरला याबाबत विचारणा केली. काम थांबवा. जनतेच्या पैशाची बरबादी किती करणार असा संतप्त सवाल उपस्थीत केला. जलवाहिनी काम करण्यापूर्वीच का टाकली गेली नाही. रस्ता तयार केल्यावर तो खोदला. हा किती अजब प्रकार आहे. सुपरवायझरला गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन गांधीगिरी केली. हे काम तूर्तास थांबविण्यात आहे.
समन्वय ठेवा या उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
कल्याण शीळ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या वेळी २००९ साली सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश देताना महापालिका, एमएसआरडीसी, वीज वितरण कंपनी आदीं समन्वय ठेवून काम केले पाहिजे. आज रस्ता तयार झाल्यावर पुन्हा खोदल्याने एसएसआरडीसी आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले याचिकाकर्ते पाटील यांनी सांगितले.