मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीतर्फे कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष येथे लागले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे वैशाली दरेकर या निवडणूक रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे.
कल्याण मतदारसंघाची निर्मिती २००९ साली झाली. त्या आधी हा मतदारसंघ ठाणे मतदारसंघाचा भाग होता. जनसंघापासून या मतदारसंघाचा कल हा हिंदुत्ववादी विचारसरणीला काैल देत आला आहे. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून मतदारांनी उजव्या विचारसरणीला कौल दिला. येथून २००९ साली शिवसेनेचे आनंद परांजपे निवडून आले. २०१४ व २०१९ साली शिवसेनेचे डाॅ. श्रीकांत शिंदे निवडून आले. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष असला, तरी खरा सामना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असाच आहे. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
गाजत असलेले मुद्दे
उद्धवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेली टीका.उद्धवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांनाच टीकेचे लक्ष्य केले गेले.
कोण गेले कुणाकडे?
दरेकर यांना उमेदवारी दिल्याने उद्धवसेनेत नाराजी होती. ते पदाधिकारी शिंदेसेनेत गेले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांची नाराजी दूर करण्यात आली. त्यांच्या पत्नी सुलभा या खासदार शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
खासदार शिंदे यांनी ‘आमचं काम बोलतंय’ अशी विकासकामाची होर्डिंग लावली आहेत.उद्धवसेनेकडून कामे केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. केवळ जाहिरातबाजी सुरू असल्याची टीका.मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री असताना दत्तक घेतलेल्या गावात सोयी-सुविधांचा अभाव.उद्धवसेनेकडून शिंदे यांच्यासमाेर तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याची टीका.प्रदूषणमुक्त जीवन आणि रेल्वेचा सुरक्षित प्रवास नसल्याची उद्धवसेनेकडून टीका.
शिंदेसेनेकडून राजकीय धक्कातंत्राचा अवलंब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या आधी आणि आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक एका टिपेला पोहोचली असताना उद्धवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवक यांना शिंदेसेनेत घेऊन उद्धव सेनेची हवा गूल केली आहे. शिंदेसेनेकडून राजकीय धक्कातंत्राचा अवलंब केला जात आहे.
२०१९ मध्ये काय घडले ?
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेना (विजयी) ५,५९०००बाबाजी पाटील राष्ट्रवादी २,१५,०००
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष टक्के२००९ आनंद परांजपे शिवसेना -२०१४ डाॅ. श्रीकांत शिंदे शिवसेना -२०१९ डाॅ. श्रीकांत शिंदे शिवसेना