- मुरलीधर भवारकल्याण - कल्याण डोंबिवलीतील 65 बिल्डरांनी रेरा प्राधिकरणासह कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य सरकारची फसवणू केल्याचे उघड झाल्याने या बेकायदा बांधकामातील घरांची खरेदी विक्री केली जाऊ नये. तसेच घरांची नोंदणी केली जाऊ नये. नोंदणी करण्यास कोणी रजिस्ट्रेशन कार्यालयात आल्यास त्याची माहिती एसआयटीची तपास पथकाला देण्यात यावी असे पत्रच रजिस्ट्रेशन कार्यालयास दिले आहे. त्यामुळे बेकायदेशीर घरांची नोंदणी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका हद्दीतील 65 बिल्डरांनी खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवित रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. रेरा, महापालिका, राज्य सरकार या तिन्ही सरकारी यंत्रणांची फसवणू केली. हे प्रकरण वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणले. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. एसआयटीने आत्तार्पयत 1क् जणांना अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 65 बिल्डरांनी फसवणू केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या 65 बेकायदा इमारतीत घरांची नोंदणी आणि खरेदी विक्री केली जाऊ नये असे पत्र एसआयटीकडून रजिस्ट्रेशन कार्यालयास दिले आहेत. या 65 इमारतीत जवळपास 2 हजार पेक्षा जास्त सदनिका असू शकतात. या सदनिकांची खरेदी विक्री आणि नोंदणी करुन सामान्य माणसांची आर्थिक फसवणू केली जाऊ शकते. त्यामुळे रजिस्ट्रेशन कार्यालयाने या इमारतीतील घरांची नोंदणी, खरेदी विक्री व्यवहार करु नयेत. नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयात कोणी आल्यास त्याची माहिती तात्काळ एसआयटीला द्यावी असे एसआयटी तपास अधिकारी सरदार पाटील यांनी सूचित केले आहे.