शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "हिंदायान" सायकल स्पर्धा अन् मोहिमेची सुरू झाली नोंदणी

By अनिकेत घमंडी | Published: November 15, 2023 2:26 PM

"हिंदायान" झाले लाँच...; हिंदायान" स्पर्धा आणि मोहीम सर्वांसाठी खुली.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: "हिंदायान" हे निश्चितच आपल्या भारतीय वारसाचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. हिंदायान" सायकल स्पर्धा आणि मोहीम २०२४ च्या दुसऱ्या पर्वाच्या नोंदणी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हिंदायानमध्ये सामील होण्यासाठी  नागरिकांना प्रोत्साहित करताना मुख्यमंत्री म्हणाले, सायकल चालविणे आपल्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठीही निश्चित उपयुक्त  आहे. सध्याच्या परिस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी शक्य तिथे सायकलचा वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे."हिंदायान" च्या दुसऱ्या पर्वात विविध मोहिमा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्वात ही स्पर्धा व मोहीम सर्वांसाठी खुली आहे. ही मोहीम १० फेब्रुवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथून सुरू होईल आणि आग्रा, जयपूर, गांधीनगर, ठाणे आणि मुंबई मार्गे पुण्यात पोहोचल्यानंतर याची सांगता होईल .         

याशिवाय, महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत प्रत्येकी ११० किमीच्या तीन टप्प्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत."हिंदायान" चे संयोजक आणि जग परिक्रमा करणारे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय विष्णुदास चापके याप्रसंगी म्हणाले, आम्ही "हिंदायान" मोहीम सुरू करण्यामागे तीन उद्दिष्टे आहेत, पहिले उद्दिष्ट ऑलिम्पिकमध्ये २२ सायकलिंग इव्हेंट आहेत, ज्यात ६६ पदके आहेत. तथापि, गेल्या ६० वर्षात एकही भारतीय सायकलपटू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरलेला नाही. १९६४ ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा होती, ज्यामध्ये चार सायकलपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या निमित्ताने भारतीय सायकलपटूस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकेल. दुसरे उद्दिष्ट आहे ते सशस्त्र दल आणि राज्य पोलिसांचे साहसी सायकलपटू सायकल शर्यतींमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जातात, कारण त्यांना अशा स्पर्धांसाठी भारतात कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. या निमित्ताने त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल.    

आणि तिसरे उद्दिष्ट भारतात सायकलिंग संस्कृती विकसित करण्याची आणि त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आणि शाश्वत विकासासाठी मदत होईल. "हिंदायान" सायकल स्पर्धेचे पहिले पर्व ५ फेब्रुवारी ते १९फेब्रुवारी ३०२३या कालावधीत नवी दिल्ली ते पुणे यादरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाले होते. 

यावर्षी वर्ष २०२४ ची ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी  रोजी सिंहगड, पुणे येथे या स्पर्धेची सांगता होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना सायकलपटू विष्णुदास चापके पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी या मोहिमेत फक्त भारतीय भूदल आणि नौदलाचे संघ सहभागी झाले होते. मात्र यावर्षी या स्पर्धेत गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने सामील होण्यास प्रतिसाद दिला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही  (NDRF) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांचा होकार कळविला आहे. याशिवाय "हिंदायान" सर्वांसाठी खुले आहे. राईडची नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक सायकलपटूंनी नोंदणी करण्यासाठी  www.hindayan.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदे