डोंबिवली: महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात लेखिका डोंबिवलीकर लीला शहा(८७) यांचे सोमवारी पहाटे येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंड, पणती असा परिवार आहे.
मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा दिसायला छान व चुणचुणीत लीला शहा. बालकांपासून ज्येष्थांपर्यंत विविध विषयांवरील ६८ पुस्तके त्यांनी आजवर लिहिली, त्यांनी स्वतः २०० गाणी देखील लिहिली आहेत. लीला शहा यांना राज्य शासनाचे ३ यांसह अन्य ८५ विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०१७ मध्ये अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते. त्यांच्या ३२ पुस्तकांच्या पुन:प्रकाशन एकाच वेळी करण्याचा अनोखा विक्रम साहित्यात विशेष लक्षणीय ठरला होता. सोमवारी दुपारी येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"