उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील गोलमैदान येथे भाजपच्या वतीने राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली असून २१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे.
उल्हासनगर भाजपच्या वतीने अयोध्याच्या धर्तीवर रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती गोलमैदान येथे बनविली आहे. मंदिराच्या प्रतिकृती बनविण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्यासह नागरिक सहभागी झाले असून २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यापूर्वी २१ जानेवारी रोजी नेहरू चौक ते गोलमैदान दरम्यान शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तर २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी रोजी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २४ तारखेला अयोध्यावरून संत स्वामी विश्वानंद हे धर्म ध्वजयात्रा काढणार आहेत. अशी माहिती भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनी दिली आहे. प्रतिकृती मंदिराची पाहणी रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी केली. २१ जानेवारी पुर्वी मंदिराची प्रतिकृती उभी राहणार असल्याचे संकेतही रामचंदानी यांनीं दिले आहे.