शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

नमो चषक स्पर्धांना कल्याण पश्चिमेत मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा- कपिल पाटील

By अनिकेत घमंडी | Published: February 22, 2024 3:55 PM

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कबड्डीत दाखवले आपले प्राविण्य 

डोंबिवली: स्थानिक आणि तळागाळातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी आयोजित नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिम मतदारसंघातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार खेळाडू सहभागी झाले असून ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेत नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेला ते उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. पवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धा होत असून त्यामध्ये नक्कीच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह-कार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. 

आतपर्यंत चित्रकला, बुद्धीबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 /400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य, कबड्डी आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. तर पुढील दिवसांत व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, गायन या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. ज्याला आधी झालेल्या स्पर्धांइतकाच मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

खोखो पाठोपाठ कबड्डीतही नरेंद्र पवार यांनी दाखवले प्राविण्य...

काही दिवसांपूर्वी नमो चषकात झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये पवार यांनी आपल्या खोखोपटूचे प्रदर्शन घडवले होते. राजकरणात एक कसलेला खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माजी आमदार पवार यांनी बुधवारच्या कबड्डी स्पर्धेतही आपल्यातील कबड्डीपटूचे कौशल्य दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघावर चढाई करत अतिशय चपळपणे एक गडी बाद करत पवार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.  

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखील चव्हाण,  महीला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर मंडल अध्यक्ष वरूण पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस, प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जून म्हात्रे, मा.नगरसेवक अर्जून भोईर, उपाध्यक्ष अनिल चौधरी, स्वप्निल  काठे, कबड्डी स्पर्धेचे प्रमूख प्रताप टूमकर, सदा कोकणे, प्रदेश अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष डॉ. राजु राम, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील, गौरव गुजर, क्रीडा संयोजक संजय कारभारी, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी गुप्ता, उमेश पिसाळ, विनोद मुथा, राजेश ठाणगे,  लिगल सेल उपाध्यक्ष ऍड.समृध्द ताडमारे, महेंद्र मिरजकर, ठाणे जिल्हा कबड्डी असोशियनचे सर्व पंच, शाळेचे व इतर कबड्डी खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक, नागरीक उपस्थित होते.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलdombivaliडोंबिवली