शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

"फेरीवाल्यांसह रिक्षाचालक, दुकानदारही आमच्या टार्गेटवर; आम्हाला रस्ते मोकळेच हवेत"

By प्रशांत माने | Published: March 29, 2023 3:50 PM

आमदार राजू पाटील यांचा इशारा

डोंबिवली: रेल्वे स्थानक बाहेरील रस्त्यावर, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांसह, दुकानदार आणि रिक्षाचालक आमच्या टार्गेटवर असून आम्हाला रस्ते मोकळेच हवेत असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला. पाटील यांनी बुधवारी स्थानकाबाहेरील रस्त्यांची दौरा करून पाहणी केली. प्रशासनाला इशारा देताना आम्ही आता रस्त्यावर उतरलोय, नागरिकांनी निश्चिंत रहावे याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली परंतू फेरीवाला अतिक्रमण जैसे थे राहीले. यावर आमदार पाटील यांनी स्थानक परिसरात बॅनर झळकावून फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! असा इशारा केडीएमसीला दिला होता. त्यामुळे बुधवारी मनसेकडून खळखटयाक होण्याची चिन्हे होती. परंतु मनसेचे झळकलेले बॅनर पाहता प्रशासन सावध झाले आणि स्थानकाबाहेरील सर्व रस्ते फेरीवाला मुक्त असे चित्र गुरूवारी पहायला मिळाले. दरम्यान आमदार पाटील यांनी इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सकाळी स्थानक परिसराचा दौरा करून पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, विनोद पाटील, प्रल्हाद म्हात्रे, राहुल कामत, सुदेश चुडनाईक, मनोज राजे, हर्षद पाटील, निशाद पाटील, कोमल पाटील, संदीप (रमा) म्हात्रे, प्रशांत पोमेंडकर यांसह अन्य पदाधिकारी आणि मोठया संख्येने कार्यकर्ते होते. आम्ही येणार म्हणून रस्ते फेरीवाले मुक्त झाले मग ही कारवाई रोज का होत नाही अशा शब्दात आमदार पाटील यांनी प्रभाग अधिका-यांना झापले. पाहणी दौऱ्यात त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत फेरीवाला व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि वाहतूक पोलिसांशी देखील चर्चा केली. मीटर रिक्षा स्टॅण्ड चालू करा, स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, फेरीवाला पुर्नवसनासाठी देखील पुढाकार घ्यावा, रस्ते मोकळे ठेवा अशा सूचना पाटील यांनी केल्या.आमदारांचा खासदारांना सल्लाखासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरला एक रस्ता खराब होतो म्हणून अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केली. आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे देखील पाहणो त्यांनी गरजेचे आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा या स्थानकाबाहेर काय परिस्थिती आहे हे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना झापले पाहिजे. ही टीका नाही माझा सल्ला आहे. सर्व पक्षांनी एकत्र बसून जर लक्ष दिले तर चित्र बदलून लोकांना चांगली सेवा मिळू शकते याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

खालपासून वरपर्यंत सर्वच हप्तेखोरआमच्याकडून कारवाई चालू असते या अधिकाऱ्यांच्या विधानावर आमदार पाटील हे चांगलेच संतापले त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी चांगलेच खडसावले. खालपासून वर्पयत सर्वच हप्तेखोर आहेत. याची लिस्टच बाहेर काढेन. ओला आणि सुका अशा प्रकारात हप्ता वसूल केला जातो. प्रत्येकाकडून ५०० रूपये हप्ता घेतला जातो. प्रतिदिन तीन ते चार लाखांर्पयत हप्ता गोळा केला जातो असा गौप्यस्फोट पाटील यांच्याकडून करण्यात आला.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे