कल्याण-जोरदार पाऊस सुरु असल्याने आज दुपारी कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील चाळीतील एका घराचे छत कोसळून झालेल्या अपघाती घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक १३ वर्षी मुलासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. या चारही जणांना कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
२२ जून रोजी कल्याण पश्चिमेतील मौलवी या धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळून माय लेकी जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा लोकग्रमामधील एका चाळीतील घराच्या छताचा पत्रा कोशळून चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवपूजन प्रजापती (२५) ,प्रिन्स प्रजापती (१३) , ललिता प्रजापती (३२) ,उर्मिला प्रजापती (४५) ,ज्योती प्रजापती (१६) ,प्राची प्रजापती (१८) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे. जखमी हे दुपारचे जेवण करुन झोपले होते. त्याच वेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
या घटनेविषयी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितले की, ते कामावर गेले होते. रोज दुपारी देत कामावरुन घरी जेवायला येतात. ते कामावरुन घरी जेवायला येत होते. त्याना आज थोडा उशिर झाला. घराजवळ पोहताच त्यांच्या कामनावर एक मोठा धडाम असा आवाज आला. त्यांनी पाहिले तर घराचा पत्रा कोसळून चार जण जखमी झाले आहे. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णलायात नेले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पडलेल्या घराची दुरुस्ती करुन दिली जाईल असे सांगितले.