मुरलीधर भवार, डोंबिवली-रंगपंचमी निमित्त आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेला भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत रंगपंचमी साजरी केली. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगिले की, देशात ४०० पार तर महाराष्ट्रात ४५ पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत.खासदार शिंदे म्हणाले की, आज आम्ही वेगवेगळ्या रंगात जरी रंगलेले असलो तरी आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे. तो भगवा रंग आहे. हिंदुत्वाचा रंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे. त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम करतोय असे सांगितले.