कल्याण-कल्याणच्या सह्याद्री रॉक अडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रूपने काल शिवजयंतीचे औचित्य साधून चंदेरी किल्ला सर केला. या किल्ल्यावरील कचरा गोळा करुन तो गडाच्या खाली आणला. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.
कल्याणहून कजर्तकडे जाताना उजवीकडे सह्याद्रीची एक डोंगर रांग दिसते. वांगणी व बदलापूर रस्त्याच्या मधोमध डोंगररांगातून नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोर्यी, पेब आणि माथेरानची रांग दिसते. या रांगेतच भलामोठा थोरला माथा उंचावलेला दिसतो. एक प्रचंड सुळका आहे. त्याच किल्ल्याचे नाव चंदेरी आहे. ग्रुपने काल सकाळी साडे सात वाजता किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली. ग्रुप दुपारी बारा वाजता किल्ल्यावर पोहचला होता. हा किल्ला चढाईसाठी अत्यंत कठीण आहे. चढाई करणा:याची शारीरीक परिक्षा घेणारा आहे. हा किल्ला जवळपास 2 हजार ३०० फूट इतका उंच आहे. हा किल्ला टेहाळणी किल्ला होता. या किल्ल्यावरुन वांगणी, बदलापूर, कजर्त, कल्याण र्पयतचा दूरवरचा परिसर टापूत येतो. त्याच बरोबर दुस:या बाजूला पनवेलची बाजू आहे. ती एका दृष्टीक्षेपात दिसून येते. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा विराजमान आहे.
ग्रुपने किल्ल्यावर चढाई करतानाच वाटेत दिसणारा कचरा गोळा केला होता. तसेच किल्ला परिसराची स्वच्छता केली. किल्ल्याच्या मध्यभागी असेलल्या कुंडात कचरा व गाळ काढण्यासाठी ग्रुपने मानवी साखळी करुन कुंड स्वच्छ करण्याचे काम केले. या मोहिमेत ग्रुपचे भूषण पवार यांच्यासह पवन घुगे, दर्शन देशमुख, जयेश हरड, भूषण पवार, विकास जाडघे, स्वरूप गायकवाड, श्रवणी गायकवाड, देविदास गायकवाड, मंगेश नलावडे, सुरज देशमुख,उद्धव घरत आदी सहभागी झाले होते. भूषण पवार यांनी सांगितले की, शिवकार्य करीत असताना आनंद झाला. ग्रुपची स्थापना होऊन दोनच वर्ष झाली आहेत. कोरोना काळात मोहिम करता आली नाही. शिवजयंतीचे औचित्य साधून चंदेरी किल्ला स्वच्छ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रुप अशा प्रकारच्या आणखीन मोहिमा करणार आहे.