अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: ठाणे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद शाळांची ख्याती आहे, त्या संस्थेची २०२३ ते २०२८ या कालावधीत व्यवस्थापन समिती सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी संस्थेच्या विष्णुनगर शाखेत संपन्न झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून संजय कुलकर्णी यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली. त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकारिणी निवड केली.
त्यानुसार उपाध्यक्ष विद्याधर शास्त्री, कार्यवाह शिरीष फडके, सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषध्यक्ष अमित भावे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. दीपक कुलकर्णी, विवेक पुराणिक, अरुण ऐतवडे, राजाराम पाटील, सतीश गुरव, प्रकाश म्हात्रे, डॉ. सरोज कुलकर्णी, ऍड.ललिता जोशी, शिला गवळी आदींची नावे जाहीर करण्यात आल्याचे सोमवारी सांगण्यात आले. निवडणूकित सुमारे ६१ सभासदानी मतदान।केले, त्यामध्ये अध्यक्ष संजय।कुलकर्णी यांना ५४ मते तर सर्वाधिक मते माजी अध्यक्ष डॉ. वाघमारे, आणि ऍड. जोशी यांना प्रत्येकी ५७ मते।मिळाली. एकूण १७ जणांनी निवडणूकीसाठी अर्ज केले होते, त्यापैकी १५ जणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिवकुमार इनामदार यांनी निवडणूक अधिकारी आणि डी बी आपटे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडणूकीच्या आधी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली, त्यामध्ये आधीच्या कार्यकारीणीने केलेल्या कार्याचा अहवाल वाचणे, कामांचा आढावा यासह आर्थिक अहवाल बाबत माहिती दिली. संस्थेच्या शाळांची गुणवत्ता उंचावणे, रोजगाराभिमुख स्किल डेव्हलपमेंट या विषयानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सोबतच रोजगाराभिमुख संधी आदी विषयांवर प्रामुख्याने काम।करण्यावर भर देण्यात येणार आहे : संजय।कुलकर्णी, अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली.