कल्याण : एमआयडीसीच्या बड्या गुरुत्व जल वाहिनीवरुन सव्हीर्स सेंटरने बेकायदा नळ जोडण्या घेऊन पाणी चोरीचा जोरदार धंदा सुरु केला होता. या बेकायदा नळ जोडण्याच्या विरोधात आज एमआयडीसी आणि केडीएमसीने संयुक्त कारवाई सात बेकायदा नळ कनेक्शन कट केले आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. तसेच ग्रामीण भागातील २७ गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. त्या पाण्याचे बील महापालिका एमआयडीसीली भरते. एमआयडीसीकडून पुरविल्या जाणाऱ्या जलवाहीनीद्वारे पाण्याचा दाब कमी मिळते. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत नागरीकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीकांच्या तक्रारी आहेत.
या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीपश्चात आज एमआयडीसीच्या गुरुत्व वाहिनीवरुन बेकायदा नळ जोडण्या घेतल्या आहेत. या जोडण्याद्वारे पाणी चोरी करुन दुचाकी, चार चाकी गाड्या धुण्याच्या धंदा केला जात आहे. कोळेगाव आणि हेदूटणे या गावातील सात बेकायदा नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई आज करण्यात आली. प्रभाग अधिकारी भारत पवार यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अभियंते किरण वाघमारे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. याच कारवाई दरम्यान या भागातील ६५ बेकायदा शेड तोडण्याची कारवाई केली गेली. याशिवाय बेकायदा ९ जोते जमीदोस्त करण्याची कारवाई केली गेली. मानपाडा पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उद्या देखील सुरु राहणार आहे.