कल्याण: शहराच्या पूर्व भागातील विजयनगर परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बॅनर गेल्या सहा महिन्यापासून फाडले आणि काढले जात होते. जेव्हा बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याने सीसीटीव्ही लावले. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. या सीसीटीव्हीत एक व्यक्ती बॅनर काढून फेकताना दिसून आला. कोळसेवाडी पोलिसांनी करण नावाच्या व्यक्तीसह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजयनगर परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विधानसभा सन्वयक प्रशांत काळे यांच्या पत्नी माजी नगरसेविका माधूरी काळे यांच्याकडून गेल्या सहा महिन्यापासून बॅनर लावले होते. मात्र लावण्यात आलेले बॅनर रात्रीच्या अंधारात कधी फाडले जात होते. तर कधी काढले जात होते. या प्रकारामुळे काळे त्यांच्या नगरसेविका पत्नी माधूरी या हैराण झाल्या होत्या. नक्की हा प्रकार कोणाकडून सुरु आहे. अखेर त्या व्यक्तिला शोधण्यासाठी काळे यांनी सीसीटीव्ही लावले. या सीसीटीव्हीत बॅनर काढून फेकणारा व्यक्ती दिसून आला. बॅनर काढणाऱ्या व्यक्तीने काळे यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते की, या ठिकाणी बॅनर लावू नये. यावरुन वाद झाला होता. तो व्यक्ती सातत्याने बॅनर काढण्याचे काम करीत होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात काळे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. अखेर पोलिसांनी बॅनर काढणाऱ्या करण आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.