कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील गाैरीपाडा परिसरातील एका सात वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव प्रणव भाेसले असे आहे. या मुलाच्या हत्ये प्रकरणी खडकपाडा पाेलिसांनी नितीन कांबळे याला अटक केली आहे.
मुलाच्या आईने घेतलेले पैसे परत न केल्याने त्याने मुलाची हत्या केली असल्याचे कारण तूर्तास समाेर आले असले तरी हत्येमागे अन्य काही कारण हाेते का याचा तपास खडकपाडा पाेलिस करीत आहे. या हत्येमुळे गाैरीपाडा परिसरात एकच खळबळ माजली आहे.
प्रणव हा काल शाळेत गेला हाेता. शाळेतून ताे घरी परत आला नाही. त्याची आई कविता भाेसले हिने शाळेत जाऊन विचारपूस केली. त्यावेळी कविताला माहिती मिळाली की, मुलगा नितीन साेबत गेला आहे. मुलगा घरी आला नसल्याने तिने खडकपाडा पाेलिस ठाणे गाठले. त्याचवेळी नितीन कांबळे हा देखील खडकपाडा पाेलिस ठाण्यात पाेहचला हाेता. त्याने कविता नावाच्या महिलेने त्याच्याकडून पैसे घेतले आहेत. ती पैसे परत करीत नसल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे पाेलिसांना सांगितले.
नितीन आणि प्रणवची आई कविता हे दाेघे परिचित असल्याने पाेलिसांना संशय आला. त्यांनी नितीनला अटक केली. पाेलिसांनी नितीला पाेलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने प्रणवची हत्या केल्याची कबूली दिली आहे. नितीनने आेळखीचा फायदा घेत दुपारीच शाळेतून प्रणवला घेतले. प्रणवला घेऊन ताे थेट गाैरीपाडा परिसरातील सुंदर रेसिडेन्सी या इमारतीच्या गच्चीवर पाेहचला. तिथे त्याने प्रणवला पाण्याच्या टाकीत टाकले. प्रणवचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. नितीन तिथून निघाला त्याने खडकपाडा पाेलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी जाऊन त्याने कविता नावाची महिलेस पैसे दिले आहेत. तिने ते पैसे परत केले नाही म्हणून मी आत्महत्या करणार असल्याचा बनाव रचला.
ज्या इमारतीच्या टाकीत नितीनने प्रणवला मारले. त्याच इमारतीत नितीन हा काही महिन्यापूर्वी वाॅचमनची नाेकरी करीत हाेता. पाेलिसांनी नितीनला अटक केली आहे. प्रणवचा मृतदेह पाेलिसांनी ताब्यात घेऊन ताे शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला आहे. नितीने पैशाच्या वादातून प्रणवचा बळी घेतला हेच कारण प्रवणच्या हत्येमागे आहे की, अन्य काही कारणामुळे प्रणवची हत्या करण्यात आली आहे या अंगानेही खडकपाडा पाेलिस तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"