उल्हासनगर : शहरांत भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी सर्वत्र रस्ते खोदले जात असल्याने, शहरांत धुळीचे व मातीचे साम्राज्य निर्माण झाले. तर भुयारी गटारी ओव्हरफ्लॉ होऊन रस्त्यात पाणी, चिखल व दुर्घधीचे चित्र निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यात समन्वय नसल्याने, भुयारी गटार योजने खाली सर्वत्र रस्ते खोदण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील पाहणी दौरा करून विकास योजना मुदतीत पूर्ण करण्याचा इशारा देऊन, दैनंदिन कामाचा आढावा मागितला. तेंव्हा पासून भुयारी गटारीच्या कामाला गती येऊन सर्वत्र रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकले जात आहे. मात्र या खोदलेल्या रस्त्यामुळे, वाहतूक कोंडी निर्माण होऊन सर्वत्र धुळीचे, मातीचे साम्राज्य पसरले. दरम्यान भुयारी गटारी ओव्हरफ्लॉ हाऊन रस्त्यावर दुर्घधी पाणी पसरली आहे. रस्त्यात माती व धूळ असल्याने, रस्ते निसरडे होऊन वाहने स्लिप होऊन अपघाताची शक्यता आहे. कॅम्प नं-३ येथील कामगारांना रुग्णालय, खेमानी परिसरसह रमाबाई आंबेडकरनगर रस्ता आदिसह अन्य रस्त्यात गटारीचे पाणी व गळक्या जलवाहिणीने रस्त्यावर पाणी आले. यामुळे रस्ते चिखलमय हाऊन निसरडे होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका आयुक्तानी नागरिकांना प्रथम जाण्या-येण्या साठी पर्यायी रस्त्याची तरतूद केल्यानंतरच, रस्ता खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकावे. असी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरांत पर्यायी रस्ते न देता, सरासपणे अनेक रस्ते खोदले जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताची शक्यता आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता झाला नाही.