शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
3
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
4
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
5
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
7
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
9
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
10
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
11
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
12
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
13
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
14
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
15
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
16
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
17
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
18
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
19
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
20
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक

शीळफाटा ते भिवंडी मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By मुरलीधर भवार | Published: November 13, 2022 11:21 PM

आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही असा टोला शिंदेंनी लगावला.

डोंबिवली-शीळ फाटा ते भिवंडी या मार्गावर नागपूरच्या धर्तीवर मल्टी लेव्हल प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

४४५ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची जाहिर सभा डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली परिसरात पार पडली. या प्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रस्ते या शहराच्या रक्तवाहिन्या आहे. त्यांचा विकास योग्य प्रकारे झाल्यास उद्योग व्यापाराला चालना मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युती सरकारच्या काळात उड्डाणपूल तयार केले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तयार केले. त्यावेळी याची गरज का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आत्ता तेच पूल आणि मार्ग कमी पडत आहे. राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे आमचे सरकार असून रस्ते वाहतूकीची सक्षम जाळे राज्यात विणले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा राजकीय समाचार घेताना शिंदे म्हणाले की, आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. आम्ही ५० खोके घेतले नसून आणि २०० खोके देतो. १ हजार खोके विकासासाठी दिले आहेत. टिका करणाऱ्यांनीही माहिती आहे की, एकनाथ शिंदे घेणारा नाही तर देणारा आहे. मा्झ्या पोटात बरेच काही आहे. मी ते काढू इच्छीत नाही.ते हळूहळू काढणार आहे. माझ्यावर विश्वास ठेऊन आत्ता गजानन किर्तीकर आमच्याकडे आले. तर त्यांनीही खोके घेतले का त्यांनीही गद्दारी केली का असा सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्र विकासाचा आहे. अनेकांनी ठाकरे यांना भूमिका बदला असे सांगितले. मात्र त्यांना केवळ स्वार्थ दिसतो. ते भूमिका कशी काय बदलणार असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे