कल्याण - डोंबिवली शहर शाखेतर्फे आज भाजप नेते किरीट सोमय्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. किरीट सोमय्या याच्या INS विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधी घोटाळ्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करत शिवसेने डोंबिवली पोलिसांना निवेदन दिले. तसेच सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.
या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुक राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, कविता गावंड, वैशाली दरेकर आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. या निवेदनात आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्याने घोटाळा करुन देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित तुरुंगात टाका. २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्याने मोहीम सुरु केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्याने किरीट सोमय्या पुढे आला आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमान तळावर डबे घेऊन उभा राहिला.
आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सढळ हस्ते दान केलं. नेव्हीनगर मध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८ ते १० हजार रुपये दिले. या रक्कमेचे किरीट सोमय्यांनी काय केले ते देशाला समजायला हवे, हि रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता. मात्र, सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचे आरटीआय मधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केली. त्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करत शिवसेने डोंबिवली पोलिसांना निवेदन दिले.