कल्याण- डाेंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते विकासासाठी कोटय़ावधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र काम सुरु झाले नव्हते. त्यासाठी मनसेकडून शिवसेनेला वारंवार बॅनर लावून डिवचले जात होते. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना चिमटा काढला.
आत्ता बॅनर लावले पाहिजेत असा चिमटा राजू पाटील यांना काढला. चांगल्या काम केले तर बोलायला काय हरकत आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधा:यांवर दबाव टाकून काम करुन घेणो हे आमचे काम आहे. हा लोकांचा विजय आहे. काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर लावणार अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांकरीता 11क् कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर करण्यात आला होता. काम सुरु होत नसल्याने मनसेकडून वारंवार बॅनर लावून शिवसेनेला डिवचले जात होते. कोणत्याही कामाला सुरु करण्यास काही पद्धत आणि नियम असतात असे वारंवार शिवसेनेकडून सांगितले जात होते. मात्र मनसेकडून बॅनर बाजी सुरुच होती. काही दिवसापूर्वी मनसेकडून डोंबिवली येथील मिलापनगर परिसरात पोस्टकार्ड बॅनर लावण्यात आला. तो बॅनर चर्चेचा विषय ठरला होता.
आज एमआयडीसीतील रस्त्यांचे भूमीपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितत पार पडले. यावेळी भाषणात एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदारांना चिमटा काढला. काम होणार आत्ता बॅनर लावला पाहिजे. आम्ही भूमीपूजन केल्यावर माझी सवय आहे. त्याठिकाणी सर्व सामग्री साहित्य सोबत असते. खासदार श्रीकांत शिंदे हे एक पाऊल पुढे आहे. त्यांनी जेसीबी पण आणून ठेवली आहे. आपण लोकांना बांधिल आहोत. यामध्ये राजकारण करायचे नाही. पक्षभेद मतभेद विसरून विकास कामे करायची.
एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. चांगल्या कामाला चांगले बोलण्यास हरकत नाही. सत्ताधा:यांवर दबाव टाकून काम करुन घेणो हे विरोधकांचे काम असते. आम्ही सक्षम विरोधक आहोत. काम सुरु झाले हा लोकांचा विजय आहे. नक्की अभिनंदानाच बॅनर लावायला काही लाज वाटणार नाही. याप्रसंगी केडीएमसीतील भाजपचे माजी नगरसेवक नितिन पाटील, रंजना पाटील, रणजीत जोशी, वृषाली जोशी आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.