मुरलीधर भवार-कल्याण: कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु असताना शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. कल्याण पूर्वेतील दाेन भाजपच्य महिला पदाधिकाऱ््यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन्ही महिलाला पदाधिकाऱ््यांना पक्षात नवी जबाबदारी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कल्याण लोकसभेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूस सुरु आहे. काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीसह अन्य नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडली होती. कशा प्रकारे विकास कामात त्यांना प्रशासनाकडून डावलले जात आहे. हे सांगितले होते. या आधी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात देखील आरोप प्रत्याराेप झाले होते. दोन्ही कडून एकमेकांच्या विरोधात टिका करण्यात आली होती. कल्याण पूर्वेत या दोन्ही पक्षात आलबेल नाही. हे वारंवार दिसून येते. हे सर्व सुरु असताना कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकरी निलेश शिंदे आणी माजी नगरसेविका माधूरी काळे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजप जिल्हा महिला सचिव निता चव्हाण यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या मेहरुम शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी संध्याकाळी निलेश शिंदे, माधूरी काळे, पुष्पा ठाकरे यांच्या उपस्थिती निता चव्हाणसह मेहरुम शेख यांनी शिदे गटात प्रवेश केला. निता चव्हाण यांना शहर संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. तर शेख यांना विधानसभा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे. निता चव्हाण या भाजपच्या महिला मोर्चाच्या सचिव होती. शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यानी पक्ष बांधणीकरीता चांगले काम करणार असल्याचे सांगितले.