कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांवर आज प्रशासनाने कारवाई केली आहे. उशिरा येणाऱ्यामध्ये कर्मचाऱी वर्गासह उपायुक्त आणि अभियंत्यांचाही समावेश आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांना सक्तीची असणारी बायो मेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. कोविड काळातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतू आता कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असून सरकारकडूनही बरेचसे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाजही आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.
मात्र असे असूनही महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी अद्यापही य कार्यालयीन वेळेचे पालन करत नसल्याच्या तक्रारी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेत आयुक्त डॉ. दांगडे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांना लेटलतिफ अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानूसार अतिरिक्त आयुक्त चितळे हे स्वतः आज सकाळी केडीएमसी मुख्यालयात दाखल झाले. अनेक अधिकारी कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर नसल्याचे दिसून आले. जेवणाच्या सुट्टीतही अधिकारी कर्मचारी जेवण होता. बाहेर जातात. ते पुन्हा केबीनमध्ये वेळेवर येत नाहीत. याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज उशिरा आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मात्र त्यानंतरही त्यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर मात्र त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराहीअतिरिक्त आयुक्त चितळे यांनी यावेळी दिला. या कारवाई पश्चात काय सुधारणा होते की नाही. याकडे आत्ता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"