डोंबिवली : महायुतीचे कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शोभायात्रा डोंबिवली. मानपाडा येथे येताच रस्त्यावर ठाकरे सेनेच्या पाडव्यासाठी केलेल्या व्यासपीठावर जाऊन त्या पक्षाचे नेते सदानंद थरवळ यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे उपस्थित होते. यापूर्वी शिवसेना शाखेवरून दोन्ही सेनेतील शिवसैनिक परस्परांना दोन-तीन वेळा भिडले होते, परंतु निवडणूक प्रचार सुरू असताना, ही सौहार्दाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.
इकडे ठाण्यात मात्र हरीनिवास सर्कल येथील शोभायात्रेवर होणारी पुष्पवृष्टी दोन सेनांच्या गटातटाच्या राजकारणामुळे हुकली. बदलापूर, अंबरनाथमधील नववर्ष स्वागत यात्रेकडे स्थानिक नेते व उमेदवार यांनी पाठ फिरवली. शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवार व स्थानिक लोकप्रतिनिधी करतील, अशी अपेक्षा होती. ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरातील शोभायात्रांना न चुकता नेत्यांनी, उमेदवारांनी भेट दिली.
मनसेचा सहभाग नाहीडोंबिवलीतील स्वागत यात्रेत मनसेचे आमदार राजू पाटील यांची अनुपस्थिती जाणवली. ठाण्यातही मनसेचे नेते स्वागत यात्रेत दिसले नाही. मनसेचा सायंकाळी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा असल्याने त्याच्या आयोजनात व्यस्त असल्याने मनसेचे नेते स्वागत यात्रेत सहभागी झाले नसल्याची चर्चा होती.