कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणमध्ये ८ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही यंत्रणा २६ जानेवारी रोजी पासून सुरु होणार आहे. सिग्नल तोडणा:यावर कारवाई केली जाणार आहे.आधारवाडी, खडकपाडा, संदीप हॉटेल जंक्श्न, प्रेम ऑटो, चक्कीनाका, सुभाष चौक, विठ्ठलवाडी तलाव, काटेमानीवली ही महत्वाची ८ ठिकाणो आहेत. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले आहे. त्यासाठी त्याची कंट्रोल रुम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात स्मार्ट सिटी सेंटरमध्ये कार्यान्वीत करण्यात आली आहे. एखाद्या चालकाने सिग्नल तोडल्यास त्याची नोंद सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल रुममध्ये होईल. त्यानुसार सिग्नल तोडणा:यास थेट ई-चलान पाठविले जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत वाहतूकीची समस्या मोठी आहे.या वर्दळीच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरु झाल्याने वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात शहरासाठी काय अपेक्षित आहे. याचा फीडबॅक जनतेकडून घेण्यात आला होता. २०१६ सालच्या फीडबॅकनुसार शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रथम सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करणो. तसेच प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावणो याला प्राधान्य दिले गेले होते. कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतील सिग्नल यंत्रणा उभारली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कल्याणला प्राधान्य दिले गेले आहे. दुस:या टप्प्यात डोंबिवलीचे काम केले जाणार आहे. कल्याण व डोंबिवली प्रत्येकी १० ठिकाणी निवडण्यात आली होती. कल्याणमधील आठ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत होत आहे. तर अन्य दोन ठिकाणी कार्यान्वीत होणो बाकी आहे.डोंबिवलीतही लवकर कार्यान्वीत केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पात सिग्नल यंत्रणा व सीसी टीव्ही कॅमेरा लक्ष ठेवून असल्याने नागरीकांनी स्मार्ट होत वाहतूकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
कल्याणमध्ये २६ जानेवारीपासून सिग्नल यंत्रणा होणार सुरू, सिग्नल तोडल्यास होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 7:13 PM