काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका
By मुरलीधर भवार | Published: May 15, 2024 07:55 PM2024-05-15T19:55:54+5:302024-05-15T19:57:03+5:30
केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.
कल्याण - काँग्रेस ही गेल्या अनेक निवडणूकीत गरीबी हटावचा नारा देत आली आहे. काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी आहे. मात्र खऱ्या अर्थाने गरीबी हटविण्याचे काम मोदी सरकारने केले. काँग्रेस जर सत्तेवर आली तर धर्माच्या आधारे बजेट तयार करेल. काँग्रेस विकास करु शकतन नाही. केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार लढविणारे श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील उमेदवार कपील पाटील यांच्या संयुक्त प्रचारार्थ आज व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान मोदी यांची जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपरोक्त टिका केली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे, आमदार किसन कथोरे, राजू पाटील, विश्वनाथ भोईर, संजय केळकर, बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस नेहमी हिंदू मुस्लीमांचे राजकारण करीत आली आहे. त्यांच्या या बेमाईमानीचा कच्चा चिठ्ठा मी खुला केला आहे. यूपीए सरकारने मुस्लीमानांकरीता १५ टक्के बजेट तयार केले होते. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या धर्मावरील आधारीत बजेटला सगळ्यात प्रथम मी विरोध केला होता.
मोदी यांनी सांगितले की, सत्ता स्थापन झाल्यावर १०० दिवसात काय करायचे याचे नियोजन माझ्याकडे आहे. पण देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांना या प्रक्रियेत मी जोडून घेणार आहे. त्यांनी त्याच्या काही चांगल्या संकल्पना मला कळवाव्यात त्याची छाननी करुन चांगल्या सूचना विचारात घेऊन १०० दिवसांच्या नियोजनात आणखीन २५ दिवस जोडून घेतले जातील. १२५ दिवसात केल्या जाणाऱ्या कामातच २०४७ सालच्या संकल्प सिद्धीला बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या सत्तेत देशाच्या विकासाला ब्रेक लागला होता. २०१४ सालानंतर आम्ही सत्तेवर आल्यापासून विकासाचे सर्व ब्रेक हटवून देशाला टा’प गेअरमध्ये आणले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हरिवंश राय बच्चन यांच्या अग्नीपथ या कवितेच्या ओळी सादर करुन पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची स्तूती केली. त्याचबरोबर उबाठा हा पाकिस्तानची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत. कमरेचे सोडून डोक्याला बांधणाऱ्यांना लाच कसली अशी टिका ठाकरे सेनेवर केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी संविधान बदलले जात असणार असल्याचा अपप्रचार इंडिया आघाडीकडून केला जात आहे. हा प्रचार चुकीचा आणि निराधार आहे. त्याला बळी पडू नका असे आवाहन केले.