सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : पश्चिमेकडील रेल्वे शाळेच्या वर्गात गुरुवारी धामण नावाचा साप निघाला. साप निघाल्याने शाळेतील शिक्षकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. वन्यजीव बचावात सक्रिय कार्यरत असलेल्या वॉर फाउंडेशनना संपर्क करत शाळेने सदरची माहिती दिली. तेव्हा सर्पमित्र सतीश बोबडे व साहस बोबडे यांनी घटनास्थळी जाऊन धामण जातीच्या सापाचा सुखरूप बचाव केला.
धामण हा साप पूर्णपणे बिनविषारी असून त्यापासून मानवाला कोणताही धोका नाही. तसेच शहरी भागात उंदरांची संख्या कमी करण्यासाठी धामण ह्या सापाचा फार मोठा वाटा आहे. सेच बचाव केलेला सर्प लवकरच वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती सतीश बोबडे यांनी दिली.