कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्नीशमन विभागात २९२ जागा खाली आहेत. त्यामुळे अग्नीच्या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाडय़ा पोहचण्यास उश्ीार होतो असा धक्का दायक खुलासा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी विधान सभेत केला आहे. पाच मिनीटात घटनास््थली पोहचणा:या केडीएमसीच्या अग्नीशमन दलास गेल्या दोन वर्षापासून घटनास्थळी पोहचण्यास उशीर होत आहे. लवकरात लवकर अग्नीशमन दलातील कर्मचा:याच्या रिक्त भरण्यात याव्यात अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.
क्ल्याण पूर्व भागातील तिसगाव परिसरात तीन दिवसापूर्वी तिसगाव आणि लोकग्राम या दाेन ठिकाणी एकाच दिवशी आग लागल्याची घटना घडली. एका घराला तिसगाव परिसरात भीषण आग लागली होती आगीने रौद्र रुप धारण केले. अग्नीशमन दलाने आग विझविली. आगीत जिवित हानी झाली नाही. घराचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घटना स्थळी धाव घेतली. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांनी आज विधानसभेत धक्कादायक खुलासा केला आहे.
आग लागल्याच्या घटनेनंतर जवळपास एक तास उशिराने अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. महापालिकेचा अग्नीशमन विभाग नेहमीच सर्तक असताे. पाच मिनिटात गाडी घटना स्थली पोहते. मात्र गेल्या २ वर्षापासून परिस्थिती बिघडली आहे. याचे कारण या विभागातील २९२ जागा रिक्त आहे. या विभागात कंत्राटी कामगार घेतले आहे रिक्त जागा लवकर भरल्या पाहिजेत अशी मागणी गायकवाड यांनी केली. तसेच त्यासाठी महापालिकेस राज्य सरकारने आदेश द्यावेत याकडे लक्ष वेधले.