कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोराना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या सोसायटय़ा तूर्तास तरी सील केल्या जाणार नाही. मात्र ज्या सोसायटीतील 25 टक्के नागरीक पॉझीटीव्ह आल्यास त्या सोसायटीतील नागरीकांनी कोरोनाची अॅण्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी. तसेच ज्यांनी लसीकरण केले नाही. त्यांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्या सोसायटय़ा कोरोना नियम पाळणार नाही. त्या सोसायटीला पहिल्या वेळेस पाच हजार आणि दुस:या वेळेस दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
ज्या सोसायटीतील नागरीक कोरोना पॉझीटीव्ह आले. त्या सोसायटीत नोकर, घर काम करणा:या महिलांना प्रवेश दिला जाऊ नये. नोकर आणि घरकाम करणा:या महिलांनी लसीकरण केले आहे की नाही. दोन्ही लसीचे डोस घेतले आहे की नाही याची पाहणी करुनच त्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी सोसायटी व्यवस्थापनाची असेल. महापालिकेच्या पाहणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. काही नागरीक अॅमेझॉनवरुन कोरोना कीट मागवून सेल्फ किटद्वारे कोरोना चाचणी करतात. त्यांनी त्याची नोंद अॅपवर केली पाहिजे.
काही राजकीय् ा मंडळींनी महापालिकेचे खच्चीकरण करणारे वक्तव्य केले आहे. नागरीकांचे खच्चीकरण करणारे वक्तव्य राजकीय मंडळींनी करु नये असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. काही त्रूटी असल्यास त्यांनी जरुर सांगाव्यात याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले आहे. कोरोनाशी मुकाबला करताना महापालिकेच 17 कर्मचारी मृत्यूमुखी पडले. काही पदाधिकारी मृत्यूमुखी पडले. ही परिस्थिती लक्षात घेता. कामगारांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. महापालिका हद्दीतील रुग्ण संख्या कमी झाल्याने जंबो कोविड रुग्णालये बंद करण्यात होती. त्यातील सर्व आरोग्य यंत्रणा चांगल्या स्थितीत आहे. गरज पडल्यास ही जंबो कोविड सेंटर पुन्हा सुरु केली जातील असेही आयुक्तांनी सांगितले.