अनिकेत घमंडी, डोंबिवली: मध्य रेल्वेने गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी गुरुवारच्या मध्यरात्री सीएसएमटी-कल्याण / ठाणे / बेलापूर स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उपनगरीय विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबेल. तपशील खालीलप्रमाणे-
मेन लाइन - डाऊन स्पेशल:
- सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून मध्यरात्री 01.40 वाजता सुटून कल्याणला पहाटे 3.10 वाजता पोहोचेल.
- सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि पहाटे 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.
- सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून पहाटे 03.25 वाजता सुटेल आणि पहाटे 4:55 वाजता कल्याणला पोहोचेल.
मुख्य लाइन अप विशेष:
- कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून 12:05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
- ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 01:00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 02:00 वाजता पोहोचेल.
- ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 02.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 03:00 वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन - डाऊन स्पेशल:
- सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 01:30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02:35 वाजता पोहोचेल.
- सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 02:45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03:50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन अप विशेष:
- बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 01:15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02:20 वाजता पोहोचेल.
- बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 02:00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 03:05 वाजता पोहोचेल.
कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी जनतेला सुरक्षित आणि योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.