अनिकेत घमंडी/ डोंबिवली: महापालिकेकडून डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या देखभालीची निविदा तिसरा कॉल घेऊनही उघडण्यास जाणूनबुजून विलंब करण्यात येत असल्याची टीका शहरातील।क्रीडा प्रेमी, दक्ष नागरिकांनी केली. शहरातून चांगले राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करायचे नाहीत का? असा सवाल त्या नागरिकांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना केला. ते म्हणाले।की, खाजगी ठेकेदारांच्या दबावामुळे आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे तर हा विलंब होत नाही ना? संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल हे राष्ट्रीय खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने अद्ययावत प्रशिक्षक, उत्तम मैदान, चांगल्या सुविधा देण्याच्या व्यवस्थेखाली येण्यासाठी या उद्देशासाठी सदर निविदा काढण्यात आली होती. परंतु काहीजण यात खोडा घालायचा प्रयत्न करीत आहेत.
आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील आदींसह लोकप्रतिनधींनी यात लक्ष घालावे जेणेकरून कल्याण डोंबिवली मध्ये चांगले खेळाडू तयार होन्यापासून जो खोडा घालत असेल त्याला चांगली समज मिळेल अशी सकारात्मक अपेक्षा राजू नलावडे, एच. डी. शेवाळे, एस.जी.कर्वे, व्ही. डी. सावंत आदींनी व्यक्त केली. शहरात चांगले खेळाडू आहेत, त्यांना दिशा मिळणे गरजेचे असून वेळीच लक्ष घातले नाहीतर मुलांचे भरपूर नुकसान होईल, एक पिढी खेळ न खेळताच तयार झाली, आता आणखी किती मुलांचे नुकसान करणार? आणि त्यांचे नुकसान क।करावे, त्यांची बौद्धिक वाढ जेवढी महत्वाची आहे तेवढीच शाररिक वाढ गरजेची आहे, वेळीच सगळया नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी लक्ष घालून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होण्यासाठी किमान हातभार लावावा अशी मागणी नागरिकांनी केली.