डोंबिवली: बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्या स्थानकातून रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे, तेथून प्रतिदिन सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. असे गाडया मात्र त्या तुलनेने अपुऱ्या पडतात, मधल्यावेळेला एक तास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अंबरनाथच्या पुढे बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना लोकल नाहीत. गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा मार्गावर शटल गाड्या सोडाव्यात. अशी मागणी करत उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना गार्हाणे मांडले.
सोमवारी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात वाढते नागरीकरण लक्षात घेऊन २० मिनिटांच्या फरकाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूर कर्जतला जाणाऱ्या लोकल हव्यात. मेस्त्री दानवेना म्हणाले की, महिलांसाठी सकाळी बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर अशी महिलांसाठी खास लोकल सोडावी. कर्जत ते वशी, पनवेल,कसारा ते वासी (व्हाया पनवेल) लोकल चालू करा. बदलापूर येथे फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय नसल्यामुळे प्रवाशांना फलाट क्रमांक ३ वर यावे लागते,तरी फलाट क्रमांक एक व दोन वर शौचालय बांधून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी. बदलापूरमध्ये दुपारी दोन वाजेपर्यत असणारी आरक्षण खिडकी पूर्ण वेळ करण्यात यावी व चौकशी खिडकी चालू करण्यात यावी. उपनगरीय लोकल गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या आहेत त्या लोकलची प्रवासी वहन क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कसारा व कर्जत हे मार्ग दुहेरी असल्याने आम्ही या मार्गावर नव्या लोकल फेऱ्या वाढवू शकत नाही असे रेल्वे प्रशासन सांगत आहे. त्याचवेळी बदलापूर ते ठाणे या अंतरात अप आणि डाऊन दिशेकडे ओव्हर क्राऊड मुळे सर्वाधिक अपघाती बळी जात आहेत. यासाठी टिटवाळा व बदलापुर जास्तीतजास्त लोकल १५ डबा होणे अत्यावश्यक आहे.
४५० कोटी खर्चाचा हा प्रकल्प प्रकल्प रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी मागील सहा वर्षे प्रतिक्षेत आहे. प्रवाशांच्या सुखद सुरक्षित प्रवासासाठी हा प्रकल्प युद्धपातळीवर राबवावा असे।साकडे मेस्त्री यांनी घातल्याचे ते म्हणाले. तसेच एखादा अपघात झाल्यास बदलापूर रेल्वे स्थानकावर हमाल नाही, तरी स्थानकावर कायम स्वरुपी हमालाची नेमणूक करण्यात यावी. महिलांचा डबा,दिव्यागांचा डबा,कँन्सर पिडीतांचा डबा व माल डबा या सर्व डब्यांवर वेगवेगळे रंग दयावेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून व कल्याण दिशेकडून येणाऱ्या प्रत्येक लोकलच्या डब्यांना आतून व बाहेरुन क्रमांक दयावेत जेणेकरून डब्यांमध्ये एखादी घटना घडल्यास रेल्वेच्या यंत्रणाशी संपर्क सांधण्यास मदत होईल. त्यावर दानवे यांनी बैठक घेऊन चर्चा करू, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले