शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कल्याण शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा, नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त: आमदार राजू पाटील

By अनिकेत घमंडी | Published: July 06, 2024 11:28 AM

आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष.

डोंबिवली:    कल्याण ग्रामीण विधानसभेत सुरु असलेल्या विकास कामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार राजू पाटील यांनी पाढा वाढून सरकारचे लक्ष वेधले आहे. कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. यांसह कल्याण शिळ रस्त्यावर सुरु असलेल्या मेट्रो १२ प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली आहे. त्यामुळे भूसंपादन केलेल्या अन्य जागेवर काम करून सुरु असलेलं काम तातडीने थांबवण्याची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेली आहे. 

शासनाच्या यंत्रणांकडून नियोजनाअभावी सुरु असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने २७ गावांची न्यायालयीन लढाई,रत्स्यांची निकृष्ट दर्जाची काम यांसह मेट्रोचं सुरु असलेले काम यांसह १४ गावातील शासनाच्या नियोजन शून्यतेच्या कामाचा गोंधळ शुक्रवारी पाटील यांनी विधानसभेत मांडून सरकारला जाब विचारला आहे.           

केडीएमसी सह ठाणे मनपा क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून शून्य काम सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने केडीएमसी क्षेत्रातील २७ गावांसाठी अमृत योजनेचं काम सुरू आहे. मनपा आणि एमएमआरडीए यांच्यास्त समानव्य नसल्याने अनेक ठिकाणी जलवाहिन्या किंवा गटारांच्या कामांसाठी रस्त्यांची केलेली काम पुन्हा उखडण्यात आली आहेत. तर २७ गावांसह १४ गावांच्या प्रश्नावर देखील शासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २७ गावांची विभागणी सरकाराने केली होती. मात्र यामध्ये प्रामुख्याने महसूल देणारी गावच मनपा क्षेत्रात ठेवत बाकी गावांचा समावेश हा स्वतंत्र नगरपालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे असं न करता २७ गावांची स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत केली आहे. एमएमआर क्षेत्रात सध्या सर्रास गृहसंकुलांच्या प्रकल्पांची  काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने एमएमआरडीए आणि म्हाडाचा समावेश अधिक आहे. त्यामुळे या परिसरसाठी स्वतंत्र धरणाच्या नियोजनाची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत केली आहे. केडीएमसी क्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये मोठमोठ्या गृहसंकुलांच्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे.त्यामुळे या परिसरात भीषण पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांची आंदोलन सुरु आहेत. त्यामुळे या अनागोंदी कारभाराला विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी वाचा फोडली आहे.                          

कल्याण डोंबिवली मधील २७ गावांच्या विभाजनाचा प्रश्न,१४ गावांच्या नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न  अद्याप  देखील प्रलंबित आहे. तर  भूमिपुत्रांच्या मोबदल्याचा प्रश्न अधिवेशनात !

कल्याण शिळ रस्त्याचे काम बी भूसंपादन अभावी रखडले आहे. एमएसआरडीसी कडून अजूनही रस्ते बाधितांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम थांबलेले आहेत.त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहेत.या रस्ते बाधित भूमिपुत्रांना बाधित रक्कम ३०० कोटी ९१ लाख ९१ हजार ७१५ रुपये देणं बाकी आहे.ती तातडीने स्थानिक शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. यावेळी २७ गाव युवा मोर्चाच्या सुरु असलेल्या आंदोलनाचा दाखल देखील सरकारला आमदार पाटील यांनी विधानसभेत दिला आहे. 

जिमखाना रस्ता खोदकाम विधानसभेत!

नुकताच डोंबिवली मधील जिमखाना परिरात रस्ते काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे काम पूर्ण होताच अल्पावधीतच त्याचे खोदकाम देखील करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी पुछता है डोंबिवलीकर ! या मथळ्याखाली ट्विट देखील करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली परिसरात हे प्रकार गेल्याकाही दिवसात सततचे प्रकार सुरु आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे कारवाई होत नाही. यामुळे रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे केडीएमसी सह ठाणे मनपा क्षेत्रातील सर्व विभागातील रस्त्यांच्या कामांच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत केली आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे