कल्याण - बीएड्, एमएड् इंटिग्रेटेडच्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेण्याकरीता कल्याणच्या यशोधन ओक या तरुणाने सीईटीची परिक्षा दिली. ओक परिक्षाही उत्तीर्ण झाले. आत्ता त्यांना या अभ्यासक्रमाची सोय मुंबई विद्यीपाठात नाही. हा अभ्यासक्रम कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिकविला जातो. त्याठिकाणी जा असे सांगण्यात येत आहे. या अजब प्रकारामुळे ओक यांनी थेट या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहीले आहे.आधीच कोरोनामुळे विद्याथ्र्याच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा झाला असता आत्ता त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोर्सच उपलब्ध नसल्याने ओक यांच्यासारख्या सीईटी परिक्षा उत्तीण झालेल्या असंख्य विद्याथ्र्याचे हे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. यशोधन हे इंग्रजी साहित्य विषयातून पदव्युत्तर शिक्षित आहे. त्यांना काही कायम स्वरुपाची नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे ते कल्याणमध्ये १० ते १२ वीच्या विद्याथ्र्याना इंग्रजी भाषा विषय शिकविण्याचे काम करुन काम भागवित आहेत. त्यांनी बीएड् आणि एमएड् इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाकरीता आवश्यक असलेली सीईटी परिक्षा २७ ऑक्टोबर रोजी दिली. त्यात ते उत्तीण झाली. त्यांनी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ३० डिसेंबर रोजी अर्ज भरला. त्या अर्जावर मुंबई विद्यापीठाचा पर्यायच नव्हता. त्याठिकाणी केवळ एच पर्याय दर्शविण्यात आला होता. तो म्हणजे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ. हा पर्याय पाहून ओक यांना धक्काच बसला. त्यांनी अधिक चौकशी केली असता हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठा नाही असे सांगण्यात आले. सीईटी परिक्षा उत्तीण झालेल्या त्यांच्या सारख्या असंख्य विद्याथ्र्यानाही असाच धक्का बसला. लॉकडाऊनमुळे जगणो मुश्कील झालेले आहे. त्यात कोणच्याही हाती पैसा नाही. त्यात उच्च शिक्षण कसे काय घ्यायचे असा प्रश्न आहे. अभ्यास करुन सीईटी पास झालेले ओक यांनी सांगितलेकी, कोल्हापूर येथे कसे जायचे. त्याठिकाणी राहण्याची आणि विद्यावेतनाची सोय काही नाही. हे सगळे प्रश्न आहे. कोल्हापूरचा एकच पर्याय टाळला तर हे शैक्षणिक वर्ष फूकट जाणार आहे.ओक यांनी सीईटी सेलकडेही या बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडन सांगण्यात आले की,ब्रोशर्सवर कॉलम नंबर ४७ मध्ये मुंंबई विद्यापीठात हा अभ्यासक्रम नाही आहे. मात्र ओक यांच्या मते ब्रोशर्सवरील इतक्या बारीक तपशीलात विद्यार्थी गेलेले नाही. त्यामुळे ओक यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. मुख्य न्यायाधीश ओक यांच्या पत्रची काय दखल घेतात हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.
सीईटी परीक्षा पास झाल्यावर समोर आली अजब बाब, विद्यार्थ्याने थेट लिहिले हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 4:58 PM