उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शनिवारी व रविवारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. एका आठवड्यात स्ट्रॅक्टरल ऑडीटचा अहवाल येणार असून बहुतांशपणे दुरुस्ती सुचविण्यात येणार असल्याचे मत उपअभियंता मानकर यांनी व्यक्त केली.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाची क्षमता २०२ खाटाची असतांना रुग्णांची संख्या २६० पेक्षा जास्त आहे. तसेच बाह्यरुग्ण विभागात दररोज १ हजार ७०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येतात. शासनाने रुग्णांची संख्या पाहता मध्यवर्ती रुग्णालय ३५० खाटाचे प्रस्तावित केले आहे.
रुग्णालय इमारतीची बांधणी सन-१९८३ साली झाली असून इमारत जर्जर व्हायला सुरुवात झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून शनिवारी व रविवारी रुग्णालय इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पथकाने केले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे व बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांतकुमार मानकर उपस्थित होते.
मध्यवर्ती रुग्णालय इमारतीच्या मागच्या बाजूला रुग्णालयाची खुली जागा असून याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेज प्रस्थावित होते. त्यापैकी वैधकीय महाविद्यालय अंबरनाथ येथे गेल्याने, नर्सिंग कॉलज व ३५० खाटाचे रुग्णालय याठिकाणी उभे राहणार आहे. रुग्णालय इमारतीच्या स्ट्रॅक्टरल ऑडिटचा अहवाल एका आठवड्यात येणार आहे. मात्र ऑडिट करणाऱ्या अभियंता पथकाचे इमारत दुरुस्ती योग्य असल्याचे मत व्यक्त केले, असे उपकार्यकारी अभियंता प्रशांत कुमार मानकर यांचे म्हणणे आहे.
रुग्णालय इमारतीची गेल्याच वर्षी रंगरंगोटी करण्यात आली असून दुरुस्तीचे काम वरचेवर केले जाते. अशी माहिती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बनसोडे यांनी दिली आहे. मात्र इमारतीचे सर्व भवितव्य येणाऱ्या स्ट्रॅक्टरल ऑडिटवर अवलंबून आहे.