कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता कल्याणडोंबिवली महापालिकेच्या वतीने कालपासून लसीकरणाची सुविधा सुरु केली आहे. काल आणि आज दिवसभरात लसीकरण केले जाणार असल्याने या लसीकरणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मात्र लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.परदेशी शिक्षणासाठी जाणा:या विद्यार्थ्यांकरीता लसीकरणाची सुविधा करण्यात यावे असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने काल आणि आजच्या दिवसात लसीकरणाची सुविधा कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रात केली होती. परदेशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने परदेशी विद्यार्थ्यांच्या लसीकरणा व्यतिरिक्त अन्य नागरीकांचे लसीकरण बंद ठेवले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी अन्य महापालिका क्षेत्रतील विद्यार्थीही कल्याणच्या केंद्रावर पोहचले होते. मात्र लसीचे डोस कमी असल्याने अन्य महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना लस देता येणार नाही असे सांगितले.या लसीकरण केंद्रावर कालच्या तारखेत २४१ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिल्या डोसचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन नोंदणी पद्धती नसून टोकन देण्यात आले होते. टोकन घेऊन विद्यार्थी रांगेत उभे होते. पहिला डोस या विद्यार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा कल्याण डोंबिवलीत घेतला आहे. मात्र परदेशी शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात होते. पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर हे ८४ दिवसांचे आहे. या अंतरानुसार त्यांना दुसरा डोस परदेशात घ्यावा लागेल. त्याऐवजी दोन डोसमधील अंतर कमी करुन ते ३० ते ४० दिवसांचे असावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याठिकाणी कोविशिल्ड लस विद्यार्थ्यांना दिली जात आहे. काही ठिकाणी विद्याथ्र्याना कोव्हॅक्सिनची लसही दिली जाणार आहे. मात्र कोव्हॅक्सिनच्या लसीचा समावेश आंतरराष्ट्रीय लसीकरणाच्या यादीत नाही हा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
लसींच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 6:03 PM
Coronavirus Vaccination : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलीये लसीकरण मोहीम
ठळक मुद्देपरदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलीये लसीकरण मोहीम