सचिन सागरे,कल्याण : कल्याण पूर्वेतील पिसवली गावात समाज उद्धार समितिद्वारे संचालित जीआरसी हिंदी हायस्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल आणि हिंदी बाल निकेतन स्कूलच्या वतीने प्रभू श्री रामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली.
अयोध्या येथे राम मंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देशात राममय वातावरण आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने हा उत्सव साजरा करत आहेत. प्राण प्रतिष्ठा समारोहाचे औचित्य साधून पिसवली गावात विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जीआरसी शाळेतून या मिरवणुकीला सुरवात झाली.
जय श्री रामच्या नाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी पिसवली गावाचा परिसर दणाणून सोडला. जीआरसी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आणि समितिचे सचिव डॉ. जे. पी. शुक्ला यांनी प्रभू रामाची प्रतीमा हातात घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले. त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणूकी दरम्यान गावातील ग्रामस्थ गोविंद माळी यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. यानंतर संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत जीआरसी शाळेत पोहचत महाआरती करण्यात आली.
५०० वर्षांनंतर अयोद्धा येथे राम मंदिराचे निर्माण होत असून प्रभू श्री राम परत येत आहेत. मंदिराच्या निर्माणांसाठी अनेक साधू संत आणि कारसेवकांनी बलिदान दिले. हि मिरवणूक त्या कारसेवकांना श्रद्धांजली असल्याचे मत डॉ. जे. पी. शुक्ला यांनी व्यक्त केले.
यावेळी समितीचे संस्थापक बबन चौबे, दीपक चौबे, करण पाल, वर्षा, जयश्री, नीतू, अदिति, सीमा, लालबहादुर यादव, कल्पना सिंह, गोमती दसौनी आदींसह गोविंद माळी, मयूर माळी, पायल उपाध्याय, सुमन यादव, रेनू उपाध्याय, सुजाता, गायत्री विश्वकर्मा, नेहा खाती, योगलक्ष्मी, अश्विनी मस्तानी, शाजिया शेख शारदा कांबले, नितिन चौरसिया,जयप्रकाश पांडेय आदी शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते.