डोंबिवली: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण ही वस्तू करोडो रुपये खर्चून तयार झालेली आहे, आणि जनतेच्या सोयीसाठी बनवलेली ही वास्तू लवकरात लवकर जनतेच्या उपयोगात आणावी अशी मागणी भाजप कल्याण जिल्ह्याचे वाहतूक सेल अद्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली. त्यासंदर्भात त्यांनी बुधवारी परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र दिले. वर्ष काम संपून झाले परंतु अद्याप नव्या इमारतीत कामकाज सुरू झाले नाही .
सध्या बिर्ला।कॉलेज जवळ पश्चिमेला असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक गैरसोयी आहेत, हजारो नागरिकांची तेथे कुचम्बणा होते, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, चांगले स्वच्छतागृह नाही, पार्किंग व्यवस्था नाही, उभं रहायला शेड नाही, आडोसे नाहीत, सगळी दुरावस्स्था आहे. त्यामुळे म्हणूनच तर दुसरी वास्तु नवीन बनवण्यात आलेली आहे मग प्रश्न हा जनतेसमोर पडतो की उद्घाटनाला विलंब का ?परिवहनमंत्र्यांना वेळ नाहीये का ?परिवहन आयुक्तांना वेळ नाहीये का? जर असं असेल, तर लोकांच्या हस्ते त्यावास्तूचे उद्घाटन करून करोडो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा जनतेचा पैसा करोडो रुपये खर्चून बनवलेली वास्तू जर धुळखात पडून राहत असेल तर कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतूक विभागाच्या माध्यमातून जन आंदोलन केले जाईल असेही माळेकर पत्रात म्हणाले.